Schezwan Sauce-Shejwan Chattani Marathi receipe Amrut Patil

एक चटपटी चटणी,दररोज तोंडी लावायला!

बनवायला एकदम सोपी!


लागणारा  वेळ :-

पूर्वतयारी :- २०  ते ३० मिनिटे
चटणी बनवण्यासाठी अंदाजे अर्धा (३० मिनिटे )तास  




साहित्य :-
लसूण -२०० ग्रॅम
आले  -२०० ग्रॅम
साखर -५०  ग्रॅम
कांदा- ५०० ग्रॅम
सुक्या लाल मिरच्या(गुंटूर किंवा बॅडगी )-१०० ग्रॅम
व्हिनेगर / लिंबू रस -४ चमचे
तेल (सूर्यफूल / सोयाबीन )-२०० मिली + (ऑलिव्ह ऑइल असेल तर ५० मिली )
जाड तालाचे भांडे
टोमॅटो सॉस २०० ग्रॅम
मीठ -४० ग्रॅम / चवीपुरते

पाणी १०० मिली


पूर्वतयारी
१ सुक्या  लाल  मिरच्या १० ते  १५ मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा
२ कांदा एकदम बारीक चिरून घ्यावा
३ आले व लसूणची मिक्सरला लावून वरवरीत पेस्ट करून घ्या
४ भिजवलेल्या मिरचीची वरवरीत पेस्ट करून घ्या

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

चटणी बनवण्याची प्रकीर्या

१ एक जाड कढईत /भांड्यात  तेल गरम करायला ठेवा
२ तेल गरम झाल्यावर बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्या
३ त्यात आले लसूनची पेस्ट घालून २-३ मिनिटे परतून घ्या
४ आता मिरचीची पेस्ट टाकून २-३ मिनिटे परतून घ्या
५ गॅस क्कमी करून त्यात मिरची पावडर, हळद, टोमटो सॉस आणि मीठ टाकून परतून घ्या
६ व्हिनेगर,साखर  टाकून त्यात १०० मिली  किंवा एक लहान वाटी पाणी टाकून मिक्स करा
७ मंद आचेवर चटणी सतत  परतत रहा
८ ३-४ मिनीटानंतर साखर  टाकून पाणी आटेपर्यंत परतत राहा
९ थंड झाल्यावर बरणीत भरून फ्रिज- (१ महिना तरी टिकते )किंवा बाहेर ठेवा (८-१० दिवस
)

Comments

Post a Comment